१ ) पूर्वजांचा इतिहास

नरसिंह पूर हा भीमा व नीरा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले अनादी क्षेत्र आहे. भक्त शिरोमणी प्रल्हाद यांच्या हातून या क्ष्रेत्री नरसिंहाची स्थापना झाली आहे. इथे नरसिंहाची वालुकामय मूर्ती आहे. प्रल्हाद नित्य नरसिंहाच्या लिंगाची पूजा करीत असे तेथे त्यावेळी वाळूचे लिंग करून पूजन करीत असे व त्याप्रमाणे त्याने त्याची स्थापना केली. हे देवस्थान फार जागरूक आहे.या ठिकाणी भक्तास साक्षात्कार होऊन त्याला मनाप्रमाणे प्रसादही मिळतो. तसेच हे क्ष्रेत्र रम्य व प्रेक्षणीय आहे.

अशा या पवित्र क्षेत्री संत निंबराज महाराज यांचे पूर्वज राहत होते. त्यांच्या वडिलांचे नाव मुरहरपंत उपनाव दंडवते . ते ऋग्वेदी देशस्थ अश्वलायन वशिष्ट गोत्री ब्राम्हण होते.श्रीनारसिंहाची पूजा करण्याचा त्यांचा मन होता.

हे तो श्रीनरहरींचे पुजारी ! नीरा भिवरा संगम नरसिंह पुरी !!
तेथील हे अधिकारी ! भोपे श्रीनरहरींचे !!

मुरहरपंतांचा या क्ष्रेत्री निर्वाह चालेल म्हणून काही उद्योग धंदा करावा या उद्देशाने आपले कुटुंबासह ते देशांतसास निघाले. फिरत फिरत हे कुटुंब दैठण ( देहठाण ) या गावी आले.

मुरहरपंत निराबाई ! हे आले देहठाण गावी !!
सुख संतोषे वस्ती दोही !! दाम्पत्याने पै केली !!

तेथे त्यांनी कुलकर्णी पणाची वृत्ती संपादन केली व उत्तमप्रकारे जोगपण मिळवले.

देहठाण विभाग वेतन ! घेतले जोतीस कुलकर्णी !!
करिती गृहस्थाश्रमी ! स्वधर्म जण परी !!

संत निंबराज महाराजांची माता निराबाई या शांत सुशील व पाटील अनुकूल अशा होत्या. त्यांचा संसारही उत्तम चालला होता . परंतु पोटी संतती नसल्याने त्यांना दुःख होते. जसजसे वय वाढत चालले तशी अधिकाधिक उदासीनता वाढत चाललंय होती. पुत्रावाचून हा संसार व्यर्थ आहे. पुत्रावाचून इह परलोकी गती नाही म्हणून पुत्र प्राप्तीसाठी अनेक धार्मिक व वैदिक उपाय केले.दान धर्मही भरपूर केला पण व्यर्थ . आपणाला आता संतती होत नाही हे पाहून याना संसाराचा वीट आला व राहिलेले आयुष्य ईश्वराच्या आराधने मध्ये घालवावे असा त्याचा ठाम निश्चय झाला. त्यामुळे घराचा त्याग करून ईश्वरप्राप्तीसाठी ते उभयता घराबाहेर पडले व पश्चिम दिशेच्या मार्गास लागले.

म्हणती आता जावे तपास ! दोघांचे मणी एकचि उल्हास !!
मनोरथ पुरवील जगदीश ! म्हणोनि मुरहरपंत निघाले !!

दैठण गावापासून पश्चिम दिशेस तीन कोसावर शिरूर हे गाव आहे. गावचे पश्चिमेस श्री शंकराचे अनादी सिद्ध स्थान आहे. श्री राम चंद्राच्या हातून या ठिकाणी लिंगाची स्थापना झाली आहे. असे रामलिंग महात्यामध्ये वर्णन आहे. म्हणून या स्थांनास रामलिंग असे म्हणतात. देवालय जुनाट दगडी बांधकामाचे आहे. गावचे उत्तर बाजूस घोडनदी आहे. नदीचे पलीकडे उत्तरेस सुमारे एक मैल अंतरावर एक टेकडी आहे. त्या टेकडीवर शंकराचे स्थान आहे. त्या टेकडीस रत्नागिरी टेकडी असे म्हणतात.

कथा संग्रह