|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

देवस्थाना विषयी

showcase image

देवस्थाना विषयी

संत श्रेष्ठ सद्गुरू निंबराज महाराजांची महती खूप मोठी आहे. त्यांचे कार्य खूप महान आहे.. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे कार्य व वारसा महाराजांचे वंशज व गावकरी हे पुढे नेत असतानाच त्यात खूप मोट्या प्रमाणात वाढ व्हावी या उद्देश्याने निंबराज महाराजांचे तीन नंबरचे चिरंजीव यांचे पिढीत चैतन्य निंबराज दंडवते यांनी १९५४ साली " श्री संत निंबराज महाराज देव देवस्थान ट्रस्ट " या नावाने ट्रस्टची स्थापना केली.आजही धार्मिक विधी तसेच पालखी सोहळा पंढरपूरला नेण्याचा मान हा संत निंबराज महाराजांचे तिसऱ्या मुलाचे वंशातच आहे. आजमितीला श्री.चंद्रकांत मुरहर दंडवते हे अध्यक्ष म्हणून काम पाहतात तर अध्यक्ष्यांसोबतच सर्वच ट्रस्टी मंडळी निंबराज महाराजांचे वंशज व सर्व गावकरी यांना सोबत घेऊन ट्रस्टचा कारभार उत्तम रीतीने पार पडत आहेत.

ट्रस्ट मार्फत प्रामुख्याने मुख्य मंदिराचे काम , सिद्ध नदीतीरी घाट बांधणे तसेच विविध उत्सव व कार्यक्रमासाठी स्टेज व पत्रा/सिमेंट सभामंडप उभारणे. गडाची डागडुजी व रंगकाम इत्यादी अनेक कामे प्रगती पथावर आहेत.तसेच भविष्यात मंदिराच्या कळसाचे भव्य दिव्य काम, सी सी टिव्ही कॅमेरे, रस्ते ,भक्तनिवास, शौचालय बाथरूम, निसर्गरम्य बागबगीचा, मोठी पाण्याची टाकी इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

अशा प्रकारे संत श्रेष्ठ निंबराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने सदर देव देवस्थान ट्रस्ट भौतिक विकासासोबतच मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावभेतून काम करू पाहत आहे व यापुढेही सदैव करत राहील.