|| जय जय राम कृष्ण हरी || गोविंदा रामा जयजय गोपाळ रामा || यादव रामा जयजय माधवा रामा || गोविंदा रामा हो जयजय || गोपाळ रामा हो जय जय ||

तो हा निंबराज । तो हा निंबराज । भक्ती चर्तुभुज जनामाजी ।। धृ ।।
किर्तन करीता देव खांदयावरी । मोरकुंचे शिरी ढाळीतसे ।।
किर्तन प्रसाद गणेशे दिधला । तांबुल सुदला मुखामाजी ।।
केडगावीची अंबा दुध पाजी भवानी । जाली तपासोनी सतत विदया ।।
माहुरीेचे बनी दत्ते प्रेमे दिल्ही । योगकळा आणिली तै पासुनी ।
शेवळयातळया अंबिका भेटली । उन्मनी लाभली निंबराजा ।।

संत निंबराज महाराजांचे संक्षिप्त जीवनचरित्र.

श्री क्षेत्र रामलिंग येथे मुरहरपंत व निराबाई या दाम्पत्याने फक्त लिंबाचा पाला खावुन अनेक वर्षे अनुष्ठान केले.याच तपश्चर्येचे फळ म्हणुन श्री शंकराच्या वरप्रसादाने श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराजांचा जगाच्या कल्याणार्थ अश्विन शु.15 शके 1527 (इ.स.1605) या शुभमुहूर्तावर जन्म झाला. निंबराज महाराजांचे गृहस्थाश्रमात फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी सतत स्वतःला देवाच्या कार्यात वाहुन घेतले. अनेक तिर्थयात्रा, काशीयात्रा केल्या. महाराजांची अध्यात्मिक तळमळ पाहुन पांडुरंग परमात्म्याच्या आज्ञेवरून सिध्दीविनाकाने जो कृपाप्रसाद दिला त्यामुळे ते किर्तन करू लागले. महाराजांना प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने पिवळी पताका व वीणा दिली.तसेच किर्तनात सुक्ष्मरूपाने स्कंदावर बसुन किर्तनाचा आनंद घेतला. निंबराज महाराजांना वेगवेगळया प्रकारचे वरप्रसाद मिळाले. निंबराज महाराजांना अनंतबुवा, शिवरामबुवा, नारायण, नरहरी अशी चार मुले व काशी, बद्राबाई अशा तीन मुली होत्या अशा प्रकारे निंबराज महाराजांनी प्रपंच व परमार्थ करून श्री शालीवाहन शके 1680 (इ.स.1678) माघ मास अमावस्या या दिवशी मृत्युलोकाचा मार्ग संपवुन वैकुंठगमन केले.

सविस्तर माहीती

नम्र आवाहन

संतश्रेष्ठ निंबराज महाराज देव देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व निंबराज महाराज भक्तांना या वेबसाईटच्या माध्यमातून कळकळीचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे कि देवदैठण येथील संतश्रेष्ठ निंबराज महाराजांची परंपरा ३५१ वर्ष जुनी आहे.संतश्रेष्ठ निंबराज महाराजांचे पुरातन मंदिर देवदैठण येथे होते त्याला खूप सुबक असा लाकडी सभामंडप होता . परंतु कालांतराने हे मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले. त्यामुळे ट्रस्ट मंडळी व गावकर्यांनी मिळून सदर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले.काही तांत्रिक अडचणींमुळे मध्यंतरी काम बंद होते पण आहे हेच काम खूप वेगाने सुरु आहे. या कामासाठी पैशांची नितांत गरज आहे तरी या वेबसाईटच्या माध्यमातून ट्रस्ट सर्व निंबराज महाराज भक्तांना कळकळीचे आवाहन करी आहे या कामासाठी आपण आपले बहुमूल्य सहकार्य करावे योगदान द्यावे व सढळ हाताने मदत करावी हि नम्र विनंती.

ट्रस्ट मार्फत प्रामुख्याने मुख्य मंदिराचे काम , सिद्ध नदीतीरी घाट बांधणे तसेच विविध उत्सव व कार्यक्रमासाठी स्टेज व पत्रा/सिमेंट सभामंडप उभारणे. गडाची डागडुजी व रंगकाम इत्यादी अनेक कामे प्रगती पथावर आहेत.तसेच भविष्यात मंदिराच्या कळसाचे भव्य दिव्य काम, सी सी टिव्ही कॅमेरे, रस्ते ,भक्तनिवास, शौचालय बाथरूम, निसर्गरम्य बागबगीचा, मोठी पाण्याची टाकी इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.अशा प्रकारे संत श्रेष्ठ निंबराज महाराजांच्या कृपाशीर्वादाने सदर देव देवस्थान ट्रस्ट भौतिक विकासासोबतच मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावभेतून काम करू पाहत आहे व यापुढेही सदैव करत राहील. तरी आपण या कामासाठी सढळ हाताने मदत करावी.ज्याला मदत देण्याची इच्छा आहे त्यांनी संपर्क करावा.

संपर्क करा
showcase image

वेबसाईटसाठी संपूर्ण आर्थिक सौजन्य


कै.गोपिका व कै.चैतन्य निंबराज दंडवते या आई वडीलांच्या स्मरणार्थ श्री.लक्ष्मीकांत चैतन्य दंडवते यांजकडुन वेबसाईटसाठी संपूर्ण आर्थिक सौजन्य मिळाले.

मनोगत

राम कृष्ण हरी
आज बुधवार दि.6 मार्च 2019 रोजी संतश्रेष्ठ सद्गगुरु निंबराज महाराजांच्या पुण्यतिथीदिवशी वेबसाईट आपणा सर्वासाठी खुली करताना मनस्वी आनंद होत आहे. महाराजांसाठी काहीतरी करावे हे एक पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे. सद्गुरु निंबराज महाराजांचे कृपाशिर्वाद व सर्वच ट्रस्टी मंडळी सर्व देवदैठण ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हे साध्य होत आहे. त्यामुळे या सर्वाचे मी प्रथमतः मनापासुन आभार मानतो. वेबसाईटच्या या हाती घेतलेल्या कामात अनेक चुकाही असु शकतात त्या सर्व पदरात पाडून त्या चुका तसेच निंबराज महाराजांविषयी अजून काही माहिती साहीत्य कोणाकडे असेल तर कृपया ट्रस्ट किंवा माझ्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
आजपर्यंत आपण सहकार्य केलेच आहे यापुढेही असेच सहकार्य करुन वेबसाईट अधिक आकर्षक बनविण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करु. मी हि वेबसाईट का बनविली याबाबचे सर्व संकल्पना उद्देश याच मनोगतातुन लवकरच सविस्तर आपणासाठी लिहील. राम कृष्ण हरी.